![]() |
महागाव : शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मोहन कांबळे, एम. एस. कांबळे, ए.जी. रेडेकर, वहिदा मुल्ला, सुकेशिनी कांबळे, आफ्रोज पठाण यांच्यासह अन्य. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये महागाव केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. या परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी मिना शेंडकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' या अभियानावर ऑनलाइन मार्गदर्शन केले.
शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप परीट व केंद्रप्रमुख अनिल बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन केले होते. शिक्षण परिषदेची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रकाश चौगुले यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. नोडल ऑफिसर मोहन कांबळे,साधनव्यक्ती विजय कुंभार, संजय कोरवी यांनी हे अभियान महागाव केंद्रातील सर्व शाळांनी प्रभावीपणे राबवताना येणाऱ्या आडचणी सोडविण्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक एम. एस.कांबळे, व्ही.व्ही. गुरबे, ए. जी. रेडेकर, वहिदा मुल्ला, सुकेशिनी कांबळे, आफ्रोज पठाण, आर. के. नाईक यांच्यासह महागाव केंद्रांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते. तंत्रस्नेही म्हणून सुभाष सुतार यांनी काम पाहिले.