Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सावधान... "ती" लिंक ओपन कराल तर फसाल!

फ्री रिचार्ज योजनेच्या नावाखाली फिरतोय फेक मेसेज





गडहिंग्लज (संतोष नाईक): Ram Mandir ऑफर:  22 January को अयोध्या में राम मंदिर स्थापित होने की खुशी में मोदी और योगी दे रहे हैं पूरे भारत को फ्री के ₹749 बाला 3 महीने का रिचार्ज |  तो अभी निचे नीले रंग की लिंक पर क्लिक करके अपने नंबर पर रिचार्ज करे। असा एक मेसेज विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरताना दिसत आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याचे उघड झाले असून दिलेली लिंक ओपन केल्यास मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावे लागण्याची शक्यता आहे.


सायबर गुन्हेगार फसविण्यासाठी विविध शक्कल लढवताना दिसत आहेत. कधी मोबाईलवर गोड संभाषण करून तर कधी अशा प्रकारचे फेक लिंक पाठवून उखळण्याचा फंडा सुरू केल्याचे दिसते. वरील प्रकारचे लिंक पाठवून त्या माध्यमातून एकतर आपले खाते रिकामे होऊ शकते किंवा आपला व्हाट्सअप क्रमांक हॅक होऊ शकतो. असे झाल्याने मोठा मनस्ताप सोसावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.


फ्री रिचार्जच्या अशा लिंक संदर्भात एका नामांकित मोबाईल नेटवर्क  कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत खात्री करण्यात आली. मात्र अशा प्रकारची कोणतीच फ्री स्वरूपातील योजना ग्राहकांसाठी जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्राहकांनी सदर लिंक ओपन करून फसगत करून घेऊ नये असे सांगण्यात आले. त्यामुळे घाईगडबडीत नागरिकांनी असे लिंक ओपन केल्यास नुकसान होऊ शकते. मुळातच असे मेसेज आल्यानंतर सतर्कता बाळगून पुढे फॉरवर्ड न करता डिलीट केल्यास हा धोका टळू शकतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.