इयत्ता दहावीचे 1994 सालचे माजी विद्यार्थी तब्बल तीस वर्षानंतर एकत्र
अष्टविनायक यात्रा सहलीच्या माध्यमातून घेतला आनंद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ-जलद्याळ (ता. गडहिंग्लज) च्या सन 1994 चे इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आले. यानिमित्ताने अष्टविनायक यात्रा आयोजित करून सहलीचा आनंद घेतला.
अष्टविनायक यात्रेचे नियोजन करण्यासाठी पुणेस्थित अमर यमगेकर, मुंबईस्थित मोहन यमगेकर आणि आशा करंबळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्याला सर्वांनी साथ दिली. या सहलीमध्ये मुंबई, पुणे, हेब्बाळ-जलद्याळ, शट्टीहळी, धोंडगट्टे, दड्डी, लिंगणुर आणि परिसरातून आपल्या कामाचा व्याप बाजूला करत, "जिवलग मित्रासाठी दोन दिवस" या संकल्पनेने तब्बल 40 जणांनी सहभाग घेतला. यामधील काही बालपणीचे सवंगडी खूप वर्षानंतर एकमेकाला भेटत होते. खूप साऱ्या आठवणींची शिदोरी घेऊन आणि श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन या सहलीची सांगता झाली.