पर्यवेक्षक मोहन कांबळे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
![]() |
महागाव : पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचा सत्कार करताना प्राचार्य आय. एस. पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, बाळकू शिंदे, एन. आर. फडके, विजयराव कांबळे, संदिप कोकितकर यांच्यासह अन्य. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये माध्यमिक शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झालेले पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचा व विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील होते. संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, माजी मुख्याध्यापक बाळकू शिंदे, एन.आर. फडके, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक सुभाष सुतार यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. तसेच माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झालेले पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. पी. डी. पाटील, बाळकू शिंदे, संदिप कोकितकर, मोहन कांबळे, आय. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेच्या किणे शाखेचे शाखाधिकारी विजयराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, विकास इंगवले, परशराम हुले, अर्जुन रेडेकर, उत्तम कांबळे, संजय कांबळे, दस्तगिर मुगळे, बसवराज देशनुरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रासंचालन प्रकाश चौगुले यांनी केले. आभार एकता पाटील यांनी मानले.