गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील विद्या प्रसारक मंडळ संचलित जागृती हायस्कूल, गडहिंग्लज यांच्या वतीने नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन व आरोग्याबाबत प्रबोधन व्हावे या उदात्त हेतूने इयत्ता दहावीपर्यंत शिकत असलेल्या मुलांच्यासाठी शनिवार दिनांक २७ जानेवारी पासून औरनाळ येथील पार्वती हायस्कूलच्या मैदानावर डॉ. घाळी शालेय लेदरबॉल क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक घाळी करंडक व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत १५ खेळाडूंचा संघ असेल. सामने सहा षटकांचे खेळविले जातील. स्पर्धेसाठी किट, शूज, पॅड, हॅन्ड ग्लोज, गार्ड व हेल्मेट आवश्यक आहे. लेदरबॉल संयोजन कमिटीकडून विकत घ्यावा लागेल. स्पर्धा सकाळी आठ वाजता सुरू होतील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धा प्रमुख संपत सावंत- (मो. ९८२२१६५२८८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.