Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील फुटबॉल स्पर्धेत न्यू होरायझन , शिवराज स्कुल अंतिम फेरीत

‘एमआर -युनायटेड’ करंडक शालेय फुटबॉल स्पर्धा


सर्वोदया स्कूल , जागृती हायस्कूलचे आव्हान संपुष्टात



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज येथे सुरू असलेल्या ‘एमआर- युनायटेड’ शालेय फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या  दिवशी न्यू होरायझन स्कूल, शिवराज स्कुल यांनी अनुक्रमे सर्वोदया स्कुल आणि जागृती हायस्कुलचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. केदारी रेडेकर पब्लिक स्कुल, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे आव्हान उपात्यंपुर्व फेरीतच संपुष्टात आले. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कुलच्या शतक महोत्सवानिमित्य तेरा वर्षाखालील मुलांच्या या स्पर्धा सुरु आहेत.



चुरशीच्या उपात्यं सामन्यात होरायझनने सर्वोदया स्कुलला सडनडेथमध्ये ३-२ असे नमविले. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. पूर्वार्धात सर्वोदयाचा साई कडूकर तर उत्तरार्धात होरायझनच्या रोमिल शहाने बरोबरीचा गोल केला. टायब्रेकरमध्येही २-२ अशी कोंडी कायम राहिली. सडनडेथमध्ये होराझनच्या समर्थ कापसे याने गोल करून संघाला जल्लोषाची संधी दिली. दुसऱ्या सामन्यात शिवराज स्कुलने नवोदित जागृती हायस्कुलचा ४-० असा मोठा पराभव केला. आलोक पाटीलने हॅटट्रीक करून सिंहाचा वाटा उचलला. रणवीर कुराडेने गोल करून मोलाची साथ दिली.



दरम्यान, उपात्यंपुर्व सामन्यात सर्वोदया स्कुलने गडहिंग्लज हायस्कुलला २ गोलनी हरविले. राजवीर शिंदेने दोन गोल मारले. होराझनने रोमील शहाच्या निर्णायक  गोलच्या जोरावर शिवाजी विद्यालयावर मात केली.



जागृती हायस्कुलने आयर्न शेटकेच्या मैदानी गोलमुळे एमआर हायस्कुलला पराजित केले. शिवराज स्कुलने भरवशाचा खेळाडू आलोक पाटीलच्या महत्वपूर्ण गोलमुळे केदारी रेडेकर स्कुलवर मात केली.



सर्वोदयाच्या साई कडूकरचा जिगरबाज खेळ 

सर्वोदया स्कूलच्या साई कडूकर याने झूंझार खेळ करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. होरायझन संघाविरुद्ध मैदानी गोल केला. उत्तरार्धात त्याने पेनल्टीचा फटका अडवून संघावरचे संकट टाळले. सामन्याच्या शेवटी तो जखमी झाला. पण, मैदानाबाहेर न पडता त्याने टायब्रेकरमध्ये तब्बल तीन फटके अडवून जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.