गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्योत्स्ना पताडे, तर उपाध्यक्षपदी सुधाकर देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी कलगोंडा पाटील, अनिल पाटील, विनायक नाईक, रमेश चौगुले, भीमाप्पा गलाटी, शिवाजी कुराडे व सभासद उपस्थित होते.
गडहिंग्लज तालुका माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध उमेदवारांमध्ये डी. व्ही. चव्हाण, के. बी. पाटील, ए. जे. पाटील, व्ही. आर. नाईक, आर. ए. चौगुले, बी. एस. गलाटी, एस. के. कुराडे, एस. एस. मगदूम, एम. एच. हलगले, एम. एस. दड्डी, सौ. एम. एन. कुंभार, आर. पी. गायकवाड, एस. एस. देसाई, एस. डी. देसाई , सौ. एस. एस. पाटील, सौ. जे. पी. पताडे, श्रीमती एस. एन. क्षीरसागर, एस. के. नाईक , एम. एम. कांबळे यांचा समावेश आहे.