दुंडगेच्या परिश्रम विद्यालयाला उपविजेतेपद
साहिल कांबळेला 'मॅन ऑफ दि मॅच'
नैतिक तेलवेकरला 'मॅन ऑफ दि सेरीज'
जागृतीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दहा षटकात सात बाद 62 धावा केल्या. आर्यन दळवी 13, शुभम साळवेकर 10, श्रेयस उपासे 10 धावा केल्या. दुंडगेच्या संकेत दावणे व साईराज देसाई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरा दाखल परिश्रम विद्यालय दुंडगेच्या संघाला दहा षटकात सर्व बाद 39 धावा करता आल्या. ओमकार जाधव व अशोक नाईक यांनी अनुक्रमे दहा व नऊ धावा करत एकाकी झुंज दिली. जागृतीच्या नैतिक तेलवेकर, साहिल कांबळे व प्रीतम दिवटे यांनी भेदक गोलंदाजी केली. जागृतीच्या साहिल कांबळेने 9 धावांत चार बळी, नैतिकने सहा धावांत दोन बळी तर प्रीतमने पाच धावांत एक बळी घेतला. अखेर 23 धावांनी जागृतीने अंतिम सामना जिंकून विजेतेपद मिळविले.
उदयोन्मुख युवा खेळाडू म्हणून तेजस गावित (साधना), उत्कृष्ट फलंदाज ओंकार जाधव, उत्कृष्ट गोलंदाज संकेत दावणे (दुंडगे), मॅन ऑफ दि मॅच साहिल कांबळे, मॅन ऑफ दि सिरीज नैतिक तेलवेकर ( जागृती हायस्कूल ) यांना गौरविण्यात आले.
विजेत्या व उपविजेत्या संघाला डॉ. घाळी चषक व मेडल्स विद्या प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. बी. जी. भोसकी, महेश घाळी, प्राचार्य विजयकुमार चौगुले, शरद शेटके, भिमशाप्पा दिवटी, प्रवीण पाटील, प्रकाश गायकवाड, मदन दंडगीदास, महावीर तेलवेकर, जगदीश गावित यांच्या हस्ते देण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक स्पर्धा प्रमुख संपत सावंत यांनी केले. पंच म्हणून महादेवी चिलमी, सागर मेतके, शुभम पेडणेकर, निखिल पाटील, भैय्या हरळीकर, राकेश चिलमी यांनी काम पाहिले. क्रीडाशिक्षक प्रकाश हारकारे यांनी आभार मानले.