महागावच्या संत गजानन अभियांत्रिकीत व्याख्यान संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महिलांनी अन्याय सहन न करता धाडसाने पुढे येऊन कायद्याचा आधार घेतला पाहिजे. असे मत सखी महिला मंडळाच्या सचिव व सामाजिक कार्यकर्त्या सौ. उज्वला दळवी यांनी व्यक्त केले.
महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती व बेटी बचाव, बेटी पढाओ अंतर्गत व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. मंगल मोरबाळे यांनी महिलांचे आरोग्य, आहार, व्यायाम यावर तर प्रा. अतुल देशपांडे यांनी 'सोशल मीडियाचा वापर' या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल सेजल माळी, रोहन महाजन, प्रवीण पाटील यांचा सत्कार सौ. दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. एस. टी. मातले, प्रा. आर. एस. देसाई, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन समन्वयक प्रा. अचला नारायणकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस एच सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. संतोष पोवार यांनी केले. आभार सेजल माळी यांनी मानले.