गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन सोहळा उपनेते व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते बुधवार दि ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता गडहिंग्लज येथील कडगाव रोडवरील विश्रामबाग कॉलनी येथे होत आहे. यावेळी उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच युवा सेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामीण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, तालुका प्रमुख दिलीप माने यांनी केले आहे.