गिजवणे येथील मूकबधिर विद्यालयाला दिली भेट
विद्यार्थ्यांना देण्यात आली पुस्तके व खेळाचे साहित्य
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गिजवणेतील मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या विद्यार्थ्यांनी पुस्तक व खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिले. चित्रकलेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या बुद्धीकौशल्याला वाव देण्यात आला.
यावेळी रिषभ बोरकर, रोहन वाघमोडे, प्रफुल्ल लोंढे, सार्थक खांडेकर, सुदर्शन चौगुले, प्रताप चाटे, विशाल देशमुख, स्वरूप कापुरे, अविनाश मरकड, सागर गोरे, अजय धनवडे हर्ष मालपाणी, अरविंद तेकणुर, प्रदीप डांगे, अभिजित पोटे, आदित्य पाटील, स्वरूप परदेशी, जिग्नेश माळी, संदेश अवटे, आदित्य देवसरकर, सुप्रिया गित्ते, नर्गिस शेख, लक्ष्मी घरटे, मृदुला आचरेकर, पूजा बेले, मानसी वाघमारे, मृणाली जगताप, मनीषा चव्हाण, साक्षी दुंदल, नेहा सिंह, ईशानी बंजारी उपस्थित होते. संस्थापक प्रा. साठे यांनी संत गजाननच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.