Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोटर पंपधारक शेतकऱ्यांकडून जुन्या दरानेच पाणीपट्टी भरून घेणार



सांगली येथे कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या बैठकीत झाला निर्णय


गडहिंग्लज तालुका मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीची माहिती 


१३६५ रुपये प्रमाणेच पाणीपट्टी भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): मोटर पंपधारक शेतकऱ्यांकडून जुन्या दरानेच पाणीपट्टी भरून घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती गडहिंग्लज तालुका मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीने आयोजित केलेल्या बैठकी दिली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्यादाराप्रमाणेच पाणीपट्टी भरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



महाराष्ट्र जल संपत्ती नियम प्राधिकरणकडील दि. २९ मार्च २०२२ रोजीचा ठोक जल शुल्क निर्धारण आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासन व पाटबंधारे विभागाकडून हेक्टरी १३६५ वरून २७००० रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वाढ करण्यात आली आहे. सदर अन्यायकारक  वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यात यावी यासाठी  दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी गडहिंग्लज पाटबंधारे विभागावर मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या भरमसाठ वाढीव पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.


दरम्यान, यासंदर्भात कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांची बैठक सांगली येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व आमदार बाबा लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे व पाटबंधारे विभागाचे  अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये वाढीव पाणीपट्टी प्रमाणे कर आकारणी न करता जुन्या कराप्रमाणे म्हणजेच रूपये १३६५ प्रमाणे भरून घेण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील सर्व शेतकऱ्यांनी जुन्या पाणीपट्टी दरानेच म्हणजेच रक्कम  १३६५ रुपये प्रमाणे भरावे असे आवाहन गडहिंग्लज विभाग शेतकरी सर्व मोटरपंपधारक अन्याय निवारक समितीच्या वतीने आज झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे.


या बैठकीस अमर चव्हाण, अमृतराव शिंत्रे , प्रशांत देसाई, सचिन जाधव, गुरूराज हत्ती, सदानंद सुभेदार, वसंत नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.