जरळी (वार्ताहर): तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री कमलेश्वर सहकारी दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व सोमगोंडा आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अंजनाताई रेडेकर होत्या. नूल येथील गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला.
स्वागत संस्थेचे अध्यक्ष व सरपंच बसवराज आरबोळे यांनी केले.श्री रामांच्या प्रतिमेचे पुजन भाजप राज्य कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले.सुरवातीला कमलेश्वर मंदिरापासून दूध उत्पादक महिलांनी कलश व आरती घेऊन नवीन दूध संस्था इमारतीत प्रवेश केला.
सुशिला आरबोळे -सुभाष आरबोळे व शांता पाटील- कलगोंडा पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. प्रा. किसनराव कुराडे, अंजनाताई रेडेकर, संग्रामसिंह कुपेकर, अनिता चौगुले, शैलजा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राणी खमलेहट्टी, दुंडापा पाटील, मंगल आरबोळे, सुभाष आरबोळे, हिंदुराव खैरे, बाबासो पाटील, सत्यापा पाटील, रमेश पाटील, सुरेश माने, पुंडलिक आरबोळे, मलगोंडा पाटील, रघुनाथ सुतार, विजयमाला आरबोळे, कलापा कांबळे, रेखा पाटील, प्रवीण आरबोळे, आण्णासाहेब पाटील, ईश्वर माने यांच्यासह सर्व दुध उत्पादक सभासद व महिला ग्रामस्थ उपस्थित होते. आभार रमेश पाटील यांनी मानले.