गडहिंग्लज (प्रतिनिधी): आयोध्यातील श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हसूरचंपू येथील शिवसेना कार्यालयात कार्यक्रम पार पडला.
प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक भीमा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. गडहिंग्लज तालुका शिवसेना ओबीसी सेल प्रमुख मारुती कमते यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्याबदल मनोगत व्यक्त केले.
यावेळी मारुती कमते, राजु गोटुरे, चंद्रशेखर खवणे, विजय पवार, संभाजी येरुडकर, सुरेश शेंडगे, अप्पासाहेब शिपुरे, सुरेश शेंडगे, सदाशिव नांगनुरे, लक्ष्मण कमते, रमेश चौगले, बिरप्पा हुकेरी, विठ्ठल मुसाई, मलाप्पा शिंगाडे यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाखाप्रमुख राजू गोटुरे यांनी आभार मानले.