शिवराज महाविद्यालयात विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम
( सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त 'विविध गुणदर्शन कार्यक्रम 'शिवराज महोत्सव 2024' उत्साहात संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक विविध गुणदर्शन विभाग प्रमुख प्रा. डी. यु. जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे उदघाटन गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. आर. सरगर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील ॲड. सुनील तेली यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सरगर, सरकारी वकील ॲड. तेली, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सांस्कृतिक कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव प्रा. अनिलराव कुराडे यांनी शिवराज महोत्सवची चर्चा आजही सर्वत्र होत असते. हा महोत्सव सर्वांनी आनंदाने व शांततेत साजरा करण्याची एक सांस्कृतिक परंपरा जपूया असे आवाहन केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लावणी, देशभक्तीपर गीते, कोळी नृत्य, विविधेतून एकता याचे दर्शन घडविणारी नृत्यगीते, हिंदी-मराठी रिमिक्स व कॉकटेल नृत्य, तसेच सदाबहार गीतांची पेशकश सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
विविध गुणदर्शन विभागाचे प्रमुख प्रा. डी. यु. जाधव व प्रा.रवी खोत, प्रा. एम. एस. घस्ती, पर्यवेक्षक टी. व्ही. चौगुले, डॉ. बी. एम. जाधव प्रा. डी. एस. महाजन, प्रा. एस.के. पाटील, प्रा. एस. एम. नार्वेकर, प्रा. श्रुती घस्ते, प्रा. सुप्रिया निकम, प्रा. डी. आर. बेलवेकर, प्रा. अनिता पोवार, प्रा. प्रज्ञा कुराडे, प्रा. प्राजक्ता जाधव, प्रा. बी. ए देसाई, प्रा. धनश्री लोंढे व गुणदर्शन विभागाच्या टीमने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान, या 'शिवराज महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिवल, फनी गेम्स, चित्रकला, पाककला, पुष्परचना, मेहंदी, रांगोळी, ग्रंथप्रदर्शन, शिवायन भित्तीपत्रक प्रकाशन, शेला-पागोटे आदींचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. नंदकुमार कोल्हापुरे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत पाटील, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, एन. सी. सी. कॅडेट, विद्यार्थी-विद्यार्थी उपस्थित होते.
विविध गुणदर्शनाची झलक पहा 👇