कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रमुख उपस्थिती
हत्तरगी: दड्डी ( ता.हुक्केरी ) येथील भावेश्वरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मॉडर्न इंग्लिश स्कुल दड्डी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी सायं ५.३० वाजता गावातील चाळोबा मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी व दड्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सिमा ढांग, संस्थेचे चेअरमन महादेव भुईंबर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य स्टीवन झळके यांनी केले आहे.