गडहिंग्लज शहरात शिवसेनेच्या वतीने जिलेबीचे वाटप
भडगाव शाखा कार्यालय व ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन
प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपतालुकाप्रमुख सुधाकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या वतीने शहरातील नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शहर प्रमुख संतोष चिक्कोडे, दिगंबर पाटील, प्रतीक क्षिरसागर, संदीप कुराडे, शंकर गवळी, मल्लापा चौगले, सागर हेब्बाळे, बाळासाहेब कडूकर, कृष्णा पाटील, संकेत रावण, सुरेश हेब्बळे, बाळू कुंभार, विशाल चव्हाण, शिवाजी येडूरकर, रोहन माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने यांचे मार्गदर्शन लाभले.
भडगाव शिवसेना शाखा कार्यालयात प्रतिमापूजन
भडगाव येथील ठाकरे पक्ष शिवसेना शाखा कार्यालयात ज्येष्ठ नागरीक जनार्दन पाटील आणि सागर पाटील याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपतालुका प्रमुख वसंत नाईक, संतोष माने, राजकुमार पाटील, देवापा जकापगोळ, विशाल चव्हाण, सदाशिव चिलमी, दयानंद नाईक, दुडांपा मधोळी, शेवंता नाईक, शांता हतरगी उपस्थित होते.
भडगाव ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन
भडगाव ग्रामपंचायत कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रविशंकर बंदी, तलाठी सौ. रुपाली कांबळे, दीपक कोरी, बाजार समिती उपसभापती रविंद्र शेंडुरे, शिवसेना उपतालुका प्रमुख वसंत नाईक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते