Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा संपन्न


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालय आणि नेहरू युवा केंद्र (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धनासाठी रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.


या स्पर्धेचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ.सुषमा पाटील यांनी केले. या कार्यक्रमास सचिव डॉ.अनिल कुराडे , प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.




यावेळी स्पर्धेतील अनुक्रमे विजेते असे- वक्तृत्व स्पर्धा- अमृता सागर, शुभम मेंगाणे, संजना शिंदे तर रांगोळी स्पर्धा- कोमल कुंभार , निकिता पाटील, ईला मंडल. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.




रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक रमण लोहार, नेहरू युवा केंद्र समन्वयक वैष्णवी भलावणकर यांनी काम पहिले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा.अशोक मोरमारे व वैष्णवी भलावणकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन प्रा.सौ.एम.आर.दंडगे, संगणक विभाग प्रमुख प्रा.सौ दीपिका खांडेकर-पंडीत, प्रा सौ.सुषमा पाटील, प्रा.सौ.प्रज्ञा कुराडे, प्रा.अस्मिता आरभावी, प्रा.सौ.व्ही.पी.कळसगोंडा, प्रा.पूजा काळगे यांनी केले.




यावेळी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व स्पर्धक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुती पाटील यांनी केले तर आभार प्रा. पूजा काळगे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.