
सौम्या दाभाडे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा निकाल ९० टक्के लागला. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जानेवारी महिन्यात ही परीक्षा घेतली.
यामध्ये सौम्या दाभाडे (75.4 ), कीर्ती राजम (70.16) , मनीषा होंडे (69.92)टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले तर प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
