गडहिंग्लज (प्रतिनिधी): पंजाब येथील पटियाला विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कायाकिंग स्पर्धेत गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या श्रुती तानाजी चौगुले हिने शिवाजी विद्यापीठ संघातून खेळताना 100 मीटर के-1 या क्रीडा प्रकारात वैयक्तिक रौप्य पदक पटकावले.
या स्पर्धेत श्रुती चौगुले या खेळाडूच्या चमकदार कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाला पहिले पदक मिळाले आहे. श्रुतीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक डॉ.राहुल मगदूम व प्रा.जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



