
महागाव : एस. के. एस. फार्मा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या संत गजानन फार्मसी संघाचा गौरव करताना प्राचार्य डी.बी.केस्ती व डॉ. अन्सार पटेल.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज फार्मसी पदविकेत एस. के. एस. फार्मा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडी तर थ्रोबॉलमध्ये बारामतीचा संघ विजयी ठरला.
या स्पर्धेत एकूण सत्तेचाळीस कॉलेजच्या संघाने सहभाग घेतला.अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत हॉलीबॉल मध्ये यशवंतराव भोसले (सावंतवाडी) विजेता तर संत गजानन महाराज (महागाव) उपविजेता ठरला. थ्रोबॉल मध्ये डेलेनिक फार्मसी (बारामती) विजेता तर कै. दादासाहेब चव्हाण (मसूर) या संघाने उपविजेता पटकावला. यावेळी उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्रिवेणी जाधव व काशीराम कुडाळकर तर उत्कृष्ट सामनावीर म्हणून ज्योती चव्हाण व ओम खामकर यांना गौरवण्यात आला
सर्व विजेत्या संघाचा व खेळाडूचा प्राचार्य डी.बी.केस्ती व प्राचार्य डॉ.अन्सार पटेल यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आला. या संपूर्ण स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिपचा किताब संत गजानन फार्मसी कॉलेजला मिळाला. निकाल जाहीर होताच विद्यार्थीनी आतशबाजी करीत जल्लोष साजरा केला.
