गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरिभक्त मंडळ दुंडगे यांच्यामार्फत हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वर पारायण व प्रवचन सोहळा कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी मंगल कलश मिरवणूक शुभारंभ चेअरमन किरण पाटील, सुरेश देसाई, ॲड. संजय देसाई , दत्ता मगदूम, ॲड. बाळासाहेब पाटील, सिदगोंडा पाटील, उपसरपंच अण्णासाहेब पाटील, रायगोंडा देसाई यांच्या हस्ते मंडप पूजन, गणेश पूजन शिवगोंडा पाटील, दुंडाप्पा मस्ती, संजय देसाई, पांडुरंग फोटो पूजन गंगापा डंगी, आप्पासो हरगापुरे, ज्ञानेश्वरी फोटो पूजन बाबुराव कोळी, भीमा धनवडे, तुकाराम महाराजांच्या फोटोचे पूजन हिराशुगर संचालक उदय देसाई, सुरेश गुलगुंजी, आप्पासाहेब कोळी , विलास सोलापूरे यांच्या हस्ते तर हळदी कुंकूचा कार्यक्रम सरपंच शिवलिला पाटील, माजी सरपंच ज्योती धनवडे यांच्या हस्ते तर विना पूजन निंगाप्पा कुंभार, पुंडलिक परीट, रामा हरगापुरे यांच्या हस्ते व ज्ञानेश्वरी पारायण आप्पासो हरगापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
काल रविवारी आप्पालाल नदाफ महाराज यांच्या प्रवचन, कीर्तन व रात्री यळगुड माऊली भजनी मंडळ दुंडगे, हरिभक्त भजनी मंडळ हरळी या मंडळाकडून हरी जागर संपन्न झाला. हरिनाम सप्ताहात दररोज सायंकाळी प्रवचन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन हरी भक्त मंडळाकडून केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले व दत्तात्रय मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले.


