गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ येथील दुरदुंडेश्वर सिध्दसंस्थान शाखामठाच्या यात्रामहोत्सवानिमित्त ज्ञानदासोह व अन्नदासोह असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निडसोसी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार (दि.३१ )रोजी श्रीना दंडवत, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी कुमार विरुपाक्ष महास्वामी, संपादन महास्वामी, निजगुणी देवरु यांचा प्रवचन, शनिवार (दि.१) रोजी सामुदायिक गुग्गुळोत्सव व विवाह सोहळा, सायंकाळी कुमार विरुपाक्ष महास्वामी, गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, प्रभुलिंग महास्वामी यांचा प्रवचन कार्यक्रम, रविवार (दि.२)रोजी पालखी महोत्सव, सायंकाळी शिवानंद स्वामींचा व मारुती शरणरु यांचा प्रवचन कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे
सोमवार (दि.३) रोजी महाराष्ट्र व कर्नाटकातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सदभक्तानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्य मठ व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

