Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन'ने दिले रुग्णाला जगण्याचे बळ

संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

कॅन्सरग्रस्त गुडघा प्रत्यारोपण 

गडहिंग्लज विभागात प्रथमच यशस्वी उपचार 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव येथील संत गजानन रुरल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील शिप्पूर येथील एका अंध रुग्णाच्या डाव्या बाजूच्या गुडघ्यावर सहा तासाच्या अथक प्रयत्नातून येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केले. कर्नाटक सुवर्ण आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत झाली. संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी करत रुग्णाला जगण्याचे बळ दिले आहे. याबद्दल या वैद्यकीय टीमचे कौतुक होत आहे.  

याबाबतची अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील शिपुर येथील ज्योतीराम तिबिले (वय ५५) हा जन्मताच अंध असलेल्या रुग्णाला दोन वर्षापासून हा त्रास जाणवत होता. त्यामुळे चालणे हे त्रासदायक होत होते. त्याच्या निदानासाठी रुग्णालयात उपचारासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. त्याला यश मिळाले नाही. शेवटी महागाव येथील हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे समजले. येथील निदानानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. तत्काळ बडोदा गुजरात येथील युनिक आर्थो प्रा.लि. या कंपनीचे अजय सुतारिया व सिद्धेश माने यांना संपर्क साधून दोन लाख किमतीचा कृत्रिम अवयव मागविण्यात आला. डॉ. अनिल पाटील व इतर टीमने सहा तासाच्या अथक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण या टीमसह कर्नाटक सुवर्ण आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रशांत होटगीमठ यांचे सहकार्य मिळाले.

'संत गजानन'मुळे जीवदान!

गेल्या दोन वर्षापासून अंध असलेल्या काकांना डाव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिले. दोन वर्षापासून अनेक हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करूनसुद्धा निदान झाले नव्हते. पण येथील हॉस्पिटलच्या टीमने शस्त्रक्रिया करण्यासाठी होकार दर्शवून तत्काळ निर्णय घेऊन मोफत शस्त्रक्रिया यशस्वी केली. याबद्दल हॉस्पिटल मधील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचे आभारी आहे. अशी प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक गजानन तिबिले यांनी व्यक्त केली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.