गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज नगरपरिषद सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. पुंडलिक सावरे व परशराम उर्फ तात्या बडदारे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
![]() |
| (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार) |
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: सर्वसाधारण प्रवर्ग - परशराम उर्फ तात्या बडदारे, संदीप बारामती, सुरेश माळगी, राकेश कांबळे, विनोद काबळे, भैरू बारामती, अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्ग- पुंडलिक सावरे, महिला प्रवर्ग- वंदना माने, दिपा वाघेला, इतर मागासवर्गीय प्रवर्ग- गजानन कुंभार, भटक्या जाती/ जमाती प्रवर्ग- सुभाष लाखे.
![]() |
| (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार) |
यावेळी बोलताना पॅनल प्रमुख पुंडलिक सावरे म्हणाले, सभासदांचा हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने केला जाईल. संस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सभासदांचेही त्यांनी आभार मानले.




