![]() |
| गडहिंग्लज : म्हाळसाकांत देसाई यांचा सत्कार करताना आप्पासाहेब बेळगुद्री. सोबत डॉ. एम. एस. बेळगुद्री, बसाप्पा आरबोळे, प्रा. शिवाजीराव होडगे व इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विजयनगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई यांची आजरा निवासी नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल बेळगुद्री कॉलनी आणि विजयनगर मित्र मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय नगर मित्र मंडळचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव होडगे होते.
स्वागत व प्रास्ताविक बसाप्पा आरबोळे यांनी केले. यावेळी डॉ.एम.एस.बेळगुद्री, प्रा.होडगे, कृष्णा नाईक यांनी मनोगते व्यक्त करत नायब तहसीलदार देसाई यांना शुभेच्छा दिल्या. श्री. देसाई यांनी सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा सत्कार मला पुढील कामकाजात शुभेच्छा देईल असे गौरवउद्गार काढले.
या कार्यक्रमास रायाप्पा धनगर, रमेश चौगुले, डी.के.पाटील, दुंडाप्पा घुळाण्णावर, सुभाष गुरव, संजय वडर, डॉ. किरण हत्ती, नंदकुमार देसाई यांच्यासह कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.डॉ. संभाजी सावंत यांनी आभार मानले.

