गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील झोकांडे स्टॉप येथील पाच लाखाच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे उदघाटन माजी सभापती विजयराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती विद्याधर गुरबे तर चंदगड विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.अजिंक्य चव्हाण, सरपंच प्रशांत शिंदे,उपसरपंच संदीप कोकितकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रा. पं.सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, विकास इंगवले, फिरोज सोलापुरे, परशुराम हुले, रामजी घेवडे, संजय गडकरी, हरिभाऊ किंकर, वीरपक्ष खानापुरे, बापू जाधव,अनिल ऐवाळे,वर्धन हुले,अमित हुले,भैय्या लाड,अनिल सुतारआदी उपस्थित होते.आभार फिरोज सोलापुरे यांनी मानले.