वार्षिक स्नेहसंमेलन; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील पॉलिटेक्निक, इंजिनियरिंग, फार्मसी, आयुर्वेद, नर्सिंग, पॅरामेडिकल महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम 'सुरेल संगम २०२३' हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲड. डॉ.आण्णासाहेब चव्हाण हे होते.
सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पारितोषिक वितरण, तज्ञांची व्याख्याने, पारंपारिक दिवस, सांस्कृतिक कार्यक्रम, डी.जे. नाईट याबरोबरच स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून प्रातांधिकारी बाबासाहेब वाघमोडे, श्रध्दा उधवणेकर, डॉ. पी. एम. कुलकर्णी, सी.एस.फडणीस, डॉ.सी.जे.खोत, चित्रा पाटील, डॉ.व्यकंटेश रायकर, निरंजनदास सांगवडेकर, डॉ डी.ए.देसाई यांनी उपस्थिती राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धेत यश संपादन केलेले व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आला. शेवटच्या दिवशी शिक्षण समूहातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'डी.जे. नाईट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. बॉलीवूड व पाश्चात्य गाण्यावर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तीन तास होऊन अधिक वेळ ठेका धरत धमाल मस्ती केली. यासाठी स्वतंत्र सेट उभारण्यात आला होता आकर्षक विद्युत रोषणाईने कार्यक्रम अधिक रंगतदार झाली.
यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, डॉ.एस.एच. सावंत, डॉ.एस.जी. किल्लेदार डॉ. अन्सार पटेल, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. डी.बी. केस्ती, प्रा. सुरेंद्र जवळी, प्रा.गजानन हतरोटी, प्रा.सुजाता शेवाळे, रजिस्टार शिरीष गणाचार्य यासह इतर शिक्षकांनी नियोजन केले.