प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीही संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आजरा येथे मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.
आजरा शहरातून महामार्गाचे काम करण्याबरोबर बायपासही करावा अन्यथा काम करू देणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
दरम्यान, आजरा येथे प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत महामार्ग किती रुंदीचा होणार, जमीन संपादन प्रक्रिया कधी होणार, झाडांचे पैसे कधी मिळणार? अशा प्रश्नांचा भडीमार बाधित शेतकऱ्यांनी केला.
यावर महामार्ग उपअभियंता टी.एस. शिरगुपी यांनी बायपास होणे बाबत प्रस्ताव तयार असल्याची सांगितले.
प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी संपादनाची प्रक्रिया लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवाजी गुरव, संपत देसाई, सुधीर देसाई, संजय तरडेकर, शिवाजी इंगळे, गणपतराव डोंगरे यांनी चर्चेत भाग घेतला.
या बातमीचा व्हिडिओ येथे👇 पहा