हत्तरगी (वार्ताहर): श्री.संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर महागाव( तालुका, गडहिंग्लज) यांच्या सौजन्याने दड्डी येथे बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समिती संचालित श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. प्रियांका पाटील, मूत्ररोग तज्ञ डॉ. सतीश हणमशेट्टी, नेत्ररोग तज्ञ डॉ.शैलजा गुंजकर, चिकित्सक डॉ. सायली सांग्रुळकर, डॉ.आय.एच.नदाफ हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.