गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुरगुड येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय कुस्ती स्पर्धेत येथील शिवराज महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी घवघवीत यश मिळवून ग्रीको रोमन क्रीडा प्रकाराची दुसऱ्या क्रमांकाची 'चॅम्पियनशिप' तर फ्री स्टाईल क्रीडा प्रकाराची द्वितीय क्रमांकाची 'चॅम्पियनशिप' मिळवली.
या खेळाडूंमध्ये रोहन रंडे (ग्रीको रोमन) 97 किलो गटात प्रथम, शुभम सिद्धनाळे (ग्रीको रोमन) 125 किलो गटात प्रथम, अनिकेत पाटील (फ्री स्टाईल) 79 गटात प्रथम क्रमांक, हर्षवर्धन वाडकर( फ्री स्टाईल) 70 किलो गटात द्वितीय क्रमांक, ओंकार पाटील (फ्री स्टाइल) 92 किलो गटात तृतीय क्रमांक, सचिन पाटील (ग्रीको रोमन) 82 किलो गटात तृतीय क्रमांक. अशाप्रकारे यश संपादन केले.
या सर्व खेळाडूंना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.