हत्तरगी (वार्ताहर): यमकनमर्डी प्रीमियर लीग सीजन- 2 क्रिकेट स्पर्धा सी.ई.एस हायस्कूल मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत यमकनमर्डीचा गणेश चॅम्पियन हा संघ विजेता ठरला.
अंतिम सामना अतिका संघ यमकनमर्डी विरुद्ध गणेश चॅम्पियन यमकनमर्डी यांच्यात झाला. हा सामना गणेश चॅम्पियन यमकनमर्डी यांनी जिंकला. या स्पर्धेतील सघांना बक्षीस वितरण युवा नेता किरण रजपुत, सदानंद गुडिकडे, अभिजित पाटील, देवापा हुंनुरी, शौकत काझी, खुतबुद्दीन बेपारी, गोविंद दीक्षित, परशराम पाटील, डॉ.मुजाहीद नालाबंद, अगसर काझी, रमजान नदाफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.