गडहिंग्लज (प्रतिनिधी): गरमागरम चटपटीत मिसळ घ्या... वडापाव फक्त दहा रुपये... अहो बघा इकडं ... समोसे फक्त पंधरा रुपये......! हे उदगार आहेत शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे. औचित्य होते शिवराज कॉलेजच्या भव्य प्रांगणात भरलेल्या मिनी बाजारचे.
शिवराज इंग्लिश स्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी म्हणून मिनी बाजारचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते या मिनी बाजारचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जे.बी. बारदेस्कर उपस्थित होते. श्री. बारदेस्कर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अॅड. दिग्विजय कुराडे, संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, प्रा. तानाजी चौगुले, नारायणराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, प्रा.पठाण उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. या उपक्रमाला पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या आनंदी वातावरणात मिनी बाजार हा उपक्रम संपन्न झाला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ.संगीता पाटील, सौ.वेरोनिका बारदेस्कर, सौ.निर्मला बारदेस्कर, सौ.दीपिका यादव, सौ.घुगरे, सौ. नदाफ, सौ.देसाई यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षिकांनी सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नेहा नेर्लीकर यांनी केले. सौ प्रतिभा जाधव यांनी आभार मानले.