गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना जनसेवा कार्यालयात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रतिमेचे पूजन येथील सखुबाई भोई व सविता स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकप्रमुख वसंत नाईक, महिला उपतालुका संघटिका मालूताई चौगुले, विभागप्रमुख मलापा चौगुले, शाखा प्रमुख बसवराज स्वामी, शेवंता नाईक, मालूताई पोवार, सुगंधा कांबळे, यशोदा तोडकर, शांता पाटील, लक्ष्मी घोलराखे, शिवापा मुर्ती, देवापा जकापगोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.