गडहिंग्लज (प्रतिनिधी): माझी वसुंधरा अभियान 3.0 स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेने शहरात एकूण 143 किलो प्लास्टिक जप्त केले. या कारवाईत एकूण पंचवीस हजाराचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक बंदी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात ही कारवाई केली.
मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज शहरामध्ये प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. तपासणीसाठी एकूण दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. तपासणी प्रमुख म्हणून सहाय्यक मिळकत व्यवस्थापक रवीनंदन जाधव, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापारी तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तपासणी पथकामध्ये सागर यावरे, शामराव वडर, निखिल बारामती, अभिजीत डोंगरे, रामा लाखे, मारुती कांबळे, संतोष मराठे, राहुल कांबळे, सौरभ लाखे, आकाश सोनटक्के, साहिल माने, संजय कांबळे, संदीप बारामती, हरीश म्हेत्री, सुभाष विटेकरी, धनराज बारामती, सचिन कांबळे यांचा समावेश होता.