गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील भीमनगर येथील महेश सुनील सुळकुडे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( सीआरपीएफ ) उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. या पदासाठी तामिळनाडू येथील कोईमतूर येथे नुकतेच संचलन पार पडले.
महेश सुळकुडे यांना आई महादेवी व वडील सुनील सुळकुडे यांच्या हस्ते व पोलीस महानिरीक्षक सतीशचंद्र वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पद बहाल करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातून महेश सुळकुडे यांची एकमेव निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.