हुक्केरी (वार्ताहर): भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीर श्रीनगर येथे 55 आर आर बटालियन मध्ये सेवा बजावणारे जवान शिवानंद बाबू शिरगावे (वय 40 रा.बडकुंद्री ता. हुक्केरी) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरगावे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बडकुंद्री ग्रामस्थांसह कुटुंबीय व नातेवाईक जवान शिवानंद शिरगावे यांच्या पार्थिवाची प्रतिक्षा करत आहेत.
जवान शिवानंद शिरगावे यांचे पार्थिव आज सायंकाळ पर्यंत मूळगावी बडकुंद्री येथे आणण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली आहे. जवान शिवानंद शिरगावे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि बंधू असा परिवार आहे.