हत्तरगी (वार्ताहर): नांगनूर के डी येथे खास दीपावली निमित्त आयोजित घोडागाडी शर्यतीत राजू नाईक (इचलकरंजी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सुनील नाईक (दानवड) तर तृतीय क्रमांक गणेश जाधव (इचलकरंजी) यांनी पटकवला.
यावेळी युवा काँग्रेस नेता किरण रजपूत महानिंग शिरगुपी, रवि गस्ती, अशोक तलवार, बसवराज देसाई, ग्रा. पं. सदस्य विलास पाटील, मजती पी के पी एस चेअरमन मन्सूर लोकापुरे, गणपती कांबळे, पत्रकार काशपा अगसर, रवि अगसर, मारुती मगदूम उपस्थित होते.