हत्तरगी (वार्ताहर): धोंडगट्टे (ता हुक्केरी )येथील श्री भैरवनाथ व श्री रेणुकादेवी (यल्लामा )यात्रेनिमित्त दिनांक 26 रोजी रात्री दहा वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केली आहे.
मोठा गट पहिले बक्षिस 7001रुपये व सन्मान चिन्ह, दुसरे 5001रुपये व सन्मान चिन्ह, तिसरे बक्षिस 3001रुपये व सन्मान चिन्ह. या शिवाय सात रोख बक्षिस देण्यात येणार आहेत. लहान गट पहिले बक्षिस 2101रुपये व सन्मान चिन्ह, दुसरे बक्षिस 1801रुपये व सन्मान चिन्ह, तिसरे बक्षिस 1501रुपये व सन्मान चिन्ह, या शिवाय तीन बक्षिस देण्यात येणार आहेत. हौशी स्पर्धाकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.