गडहिंग्लज (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या "भारत जोडो यात्रेचे" लाईव्ह स्क्रीनिंग प्रक्षेपण पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संपूर्ण देशात गाजत असलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे प्रत्यक्ष प्रक्षेपण वाहन दृश्यतंत्राद्वारे जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये व शहरात दाखविण्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात येत आहे.
त्यास गडहिंग्लज शहर व लगतच्या गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघातील गावांमध्ये चांगला प्रतिसाद लाभत आहे. अवकाळी पाऊस व सुगीच्या दिवसात देखील सदर लाईव्ह स्क्रीनिंग पाहण्यासाठी गर्दी होत असून पुढील शंभर दिवस यात्रा संपेपर्यंत हे प्रक्षेपण गडहिंग्लज व आजरा तालुक्यात दाखविण्यात येणार आहे.