दिवाळीनिमित्त संस्थेने आर्थिक हातभार लावल्याने सभासद वर्गातून समाधान व्यक्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी (तालुका गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत सभासदांना यंदा 10 टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सदर लाभांश वाटपाचा कार्यक्रम आज संस्थेचे चेअरमन करवीर इंगवले, व्हाईस चेअरमन श्रीमती शिवलीला मारुती संती यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री. महालक्ष्मी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना यंदा 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त दहा टक्के प्रमाणे सभासदांना लाभांश वाटपाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
संस्था एन.पी.ए मधून बाहेर आल्याने सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत समाधान व्यक्त करत संस्थेच्या प्रगतीचे कौतुकही केले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी अहवाल वाचनात मॅनेजर करवीर उथळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेच्या विविध योजनांची माहिती सभासदांना दिली होती. यावेळी सभासदांना संस्थेच्या ताळेबंदाची पारदर्शकपणे सर्व माहितीही देण्यात आली होती. एन.पी.ए मुळे संस्थेने 2008 नंतर सभासदांना डिव्हिडंड (लाभांश) वाटप केलेले नव्हते. मात्र संस्था आता एन.पी.ए.च्या बाहेर आली आहे. संस्थेचे पदाधिकारी व सल्लागार यांचे मार्गदर्शन व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मॅनेजर करवीर उथळे यांनी संस्थेच्या कामकाजात पारदर्शकपणा आणत वेळोवेळी संस्थेच्या हिताच्या दृष्टीने केलेले नियोजन संस्थेला फलदायी ठरले. त्यामुळे संस्था आज एन.पी.ए.तून बाहेर पडत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.
संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. मारुती संती, कै. रामाप्पाअण्णा मनवाडे, श्री. बिकनसो बजरू यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची उभारणी करण्यात आली होती. संस्थेच्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेची उलाढाल वाढली आहे. श्री. महालक्ष्मी पतसंस्था ही तेरणीतील ग्रामस्थांना आधारवड बनली आहे. संस्थेने सर्व सभासदांसह ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आहे. ही संस्था आज स्वमालकीच्या इमारतीत सुरू असून संस्थेतील कामकाजाचेही संगणकीकरण करण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगारही प्राप्त होण्यास मदत झाली आहे. सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून श्री.महालक्ष्मी पतसंस्था मोठ्या डौलाने आज गावात उभी आहे.
सध्या संस्थेकडे सोने तारण, वाहन तारण कर्ज योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सोने तारणवर कमी व्याजदरात सर्वाधिक कर्ज संस्थेकडून दिले जाते. प्रसंगी सोने तारणवर वाढीव कर्ज देऊन सभासदांसह ग्रामस्थांची आर्थिक अडचण संस्थेकडून दूर केली जाते. संस्थेने यंदा सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय जाहीर करत आपल्या यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे. लाभांश वाटप कार्यक्रमावेळी संस्थेचे चेअरमन करवीर इंगवले, व्हाईस चेअरमन श्रीमती शिवलीला संती, संचालक बिकनसो बजरु, संस्थेचे मॅनेजर व सरपंच करवीर उथळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश पुजेरी, महादेव तेगनाळे, सिद्धांना देसाई, आक्काप्पा कांबळे, सुरेश कतिगार, रुद्राप्पा भोई, शिवराई धनगर, राजेंद्र हिडदुग्गी, कर्मचारी दूंडाप्पा कांबळे, कल्लाप्पा गळाटी यांच्यासह सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.