गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट स्वरूपात संकलित झालेल्या वह्यांचे वाटप ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले.
सदर वह्यांचे वाटप गिजवणे हायस्कूल, दादा देसाई हायस्कूल इंचनाळ, महाराष्ट्र हायस्कूल अत्याळ, क्रांतिवीर मकानदार हायस्कूल ऐनापुर, हिरण्यकेशी विद्यालय हिरलगे, सावित्रीबाई हायस्कूल करंबळी, शिप्पुर विद्यालय, जखेवाडी विद्यालय, विवेकानंद कडगाव व लिंगनूर माळ येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
याप्रसंगी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. वह्या वाटप करण्यासाठी बसवराज आजरी, तुकाराम कांबळे, प्रा.जयवंत पाटील, प्रकाश माने, दीपक पाटील, हसन मकानदार, अभि पेडणेकर, मानसिंग यादव, तानाजी भांदूगरे, संतोष पाटील, विजय गुरव आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.