गडहिंग्लज (प्रतिनिधी) : अखिल भारतीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या "भारत जोडो" यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा आता कर्नाटक राज्यात असून सदरच्या भारत जोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात मोबाइल स्क्रीन व्हॅनद्वारे प्रक्षेपण करण्यात येत आहे. याचा गडहिंग्लज शहरात प्रक्षेपणाचा शुभारंभ शहर काँग्रेसचे अध्यक्ष बसवराज आजरी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे, शेखरअण्णा येरटे, संतोष चौगुले, वीरसिंग बिलावर, प्रा.आझाद पटेल, प्रा.तानाजी चौगुले, बाळासाहेब देसाई, अक्षय पाटील, उत्तम देसाई, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदरच्या यात्रेचे प्रक्षेपण गडहिंग्लज शहरातील प्रभाग निहाय चौकाचौकात व तालुक्यातील सर्व गावांमध्ये करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष बसवराज आजरी यांनी सांगितले.