![]() |
(छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात सकाळपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारी अधून मधून ढगांचा गडगडाट सुरू होता. सकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन रिमझिम पाऊस सुरू झाला. दुपारनंतर जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला.
तालुक्यात सध्या सोयाबीन कापणी व मळणी काम सुरू आहे. या पावसामुळे व्यत्यय येत असून नुकसानही होत आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच अधून मधून पाऊस कोसळत असल्याने पुन्हा हातातोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी सोडावे लागत आहे.