गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने शिवाजी विद्यापीठ विभागीय खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धा इचलकरंजी येथील जयहिंद मैदानावर पार पडल्या.
यावेळी प्रा. स्मिता बुगड यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत दिपाली पाटील, पायल जांभळे, आरती पोवार, नंदिनी मोकाशी, प्रियांका नावलगी, वैष्णवी देवरकर, वैष्णवी खैरे, सृष्टी रेडेकर, पल्लवी जाधव,आरती न्हावी, कोमल धनवटे,आकांक्षा पाटोळे, पूजा कांबळे, स्वप्नाली परीट, रोहिणी पाटील आदी खेळाडू सहभागी झाले होते.
सर्व विजेत्या खेळाडूना महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस. एम.कदम, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक डॉ.आर.डी. मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.