5 नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे "लढा परिषद"
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संकेश्वर- बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे लढा परिषद घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या लढा परिषदेची पूर्वतयारी म्हणून दिनांक 30 ऑक्टोबर रोजी संकेश्वर ते आंबोली पर्यंत "टू व्हीलर रॅली" काढण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते कॉ.शिवाजी गुरव यांनी दिली.
दरम्यान, हा लढा यशस्वी करण्यासाठी खेडे, मडिलगे, गवसे, धनगरमोळा गावच्या महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लढा परिषदेची तयारी करण्याचे ठरले. परिषदेची तयारीसाठी संकेश्वर ते आंबोली टू व्हीलर रॅली काढण्याचे नियोजन नियोजन करण्यात आले.
या रॅलीच्या माध्यमातून लढा परिषदेची जनजागृती करण्यात येणार असून या परिषदेच्या माध्यमातून या महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.