Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रात्री गस्त घालताना गडहिंग्लज पोलिसांकडून तिघे संशयित ताब्यात; मंदिरातील पितळी घंट्या जप्त

जखेवाडी- शिप्पूर फाट्यावर कडगाव गावच्या हद्दीत कारवाई

पोलिसांच्या गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे संशयित ताब्यात 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): रात्री गस्त घालणाऱ्या गडहिंग्लजच्या  पोलीस पथकाने जखेवाडी- शिप्पूर फाट्यावर कडगाव गावच्या हद्दीत तिघा संशयितांकडून मंदिरातील तीन पितळी घंट्यासह एकूण 31 हजार 546 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनसह रणजीत कुंभार (वय 23), अंकुश अनिल कुंभार (वय 22,  सर्व राहणार रासाई शेंडूर, तालुका हुक्केरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रात्रीची गस्त घालत असताना  पोलीस पथकाला दुचाकीवरून वरील तिघेजण संशयितरित्या जात असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता पाच किलो वजनाची, चार किलो आणि एक किलो वजनाची तीन पितळी घंट्या आढळून आल्या. तसेच त्यांच्याकडे दोन पक्कड, पाने, लोखंडी रॉड, रोख रक्कमही आढळली. तसेच त्यांच्या दुचाकीच्या कागदपत्राबाबतही चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी या तिघाही संशयितांकडून एकूण 31 हजार 546 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तिघाही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार राजू गाडीवड्ड यांनी गडहिंग्लज  पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार डी. एन. पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.