गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे शिवराज महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी व फूड सायन्स विभागाच्यावतीने जागतिक अन्न दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या फूड फेस्टिव्हलचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुप्रिया व्हटकर यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे म्हणाले, शिवराज विद्यालय या फेस्टिव्हलच्या माध्यमातून जागतिक अन्न दिन साजरा करीत आहे. खरेतर या फेस्टिव्हलचा लाभ समाजातील सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सध्या समाजामध्ये अन्न भेसळीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या परिसरात फूड सायन्सच्या व मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी स्टॉलवर मांडलेल्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचा ग्राहकांनी लाभ घेतला. त्याचबरोबर अन्नभेसळ ग्राहकांचे अधिकार व जागरुकता या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, प्राचार्य डॉ. पी. आर.पाटील, प्राचार्य डॉ. निवास जाधव, प्राचार्य डॉ. बी.डी.अजळकर, शेखरअण्णा येरटे, संग्राम कदम, प्रा. पी.ए.काजी, प्रा. पूजा काळगे, प्रा. अस्मिता आरभावी यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रम शिंदे यांनी केले. आभार प्रा. श्रुती पाटील यांनी मानले.नॅकचे समन्वयक प्रा किशोर अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे फेस्टिव्हल संपन्न झाले.