Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वडरगे येथील जवान दीपक गायकवाड यांचे झाशीत हृदयविकाराने निधन


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
वडरगे ( तालुका गडहिंग्लज) येथील जवान दीपक दिनकर गायकवाड (वय ३४) यांचे झाशी (उत्तरप्रदेश) येथे  हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. जवान दीपक यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवान दीपक गायकवाड यांचे पार्थिव घेऊन वाहन झाशी येथून आज सायंकाळी निघाले असून शनिवारी सकाळपर्यंत वडरगे येथे पार्थिव येण्याची शक्यता आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, जवान  दीपक गायकवाड हे भारतीय सैन्य दलात २००४ साली भरती झाले होते. भरतीनंतरचे प्रशिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी आसाम, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावली होती. सध्या ते झाशी(उत्तरप्रदेश) येथे सेवेत होते.

११ जुलै रोजी गावातून दीपक आपल्या फॅमिलीसोबत झाशी येथे गेले होते. काल रात्री ते कामावरून घरी आले होते. बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान त्यांना घरी अचानक चक्कर आल्याने  जमिनीवर कोसळले. पत्नी पूजा यांनी शेजाऱ्यांना बोलवून  दीपक यांना तत्काळ आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जवान दीपक यांचे वडील भारतीय सैन्य दलात होते. दीपक यांचेही लहानपणापासूनच सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न होते. जवान दीपक यांचे शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत वडरगे गावातील विद्यामंदिर शाळेत तर ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण विवेकानंद हायस्कुल गडहिंग्लज येथे झाले आहे. बारावीनंतर दीपक  भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे.जवान दीपक यांचे पार्थिव शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत वडरगे येथे येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.