राजेंद्र गजानन सुतार यंदाच्या पुरस्काराचे मानकरी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दिनकरराव के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लजच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत शैक्षणिक क्षेत्रात सर्जनशील कार्यासाठी देण्यात येणाऱ्या "दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार" वितरण सोहळा रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दिनकरराव शिंदे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, माळ मारुती, कडगाव रोड येथे आयोजित केला आहे. यंदाचा हा पुरस्कार कुमार भवन पुष्पनगर ( तालुका भुदरगड) येथील राजेंद्र गजानन सुतार यांना देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायबर, कोल्हापूरचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे राहणार असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अच्युत माने यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सायबर, कोल्हापूरचे सचिव व कार्यकारी विश्वस्त डॉ. रणजितसिंह शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. शि.मा. रायकर, अध्यक्ष संतोष आंबी, उपाध्यक्ष श्रीमती संजीवनी मोहिते, सचिव सचिन शिंदे, खजिनदार श्रीमती दिपाली शिंदे यांनी केले आहे.